जिल्हा

सर्वसाधारण सभा सुरू असताना सभागृहाबाहेर शस्त्रे जप्त

सर्वसाधारण सभा सुरू असताना सभागृहाबाहेर शस्त्रे जप्त
सर्वसाधारण सभा सुरू असताना सभागृहाबाहेर शस्त्रे जप्त फोटो: ठाणे वैभव

अंबरनाथमध्ये दोन संशयित ताब्यात

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाच सभागृहाबाहेर नंबर प्लेट नसलेल्या संशयास्पद चारचाकी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये तलवार आणि दांडके आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे, दरम्यान या प्रकरणी दोन संशयित इसमांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंबरनाथ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिरात गुरुवारी झाली. यावेळी नाट्य मंदिराबाहेर नंबर प्लेट नसलेली एक चारचाकी गाडी संशयास्पद उभी असल्याचा प्रकार भाजपा नगरसेवक पवन वाळेकर यांचे बंधू आकाश वाळेकर यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्वरित अंबरनाथ पोलिसांशी याबाबत संपर्क साधून तक्रार केली. गाडीची झडती घेतली असता गाडीत काही शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी वाहनासह दोघांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शिवसेना नगरसेवकांनीही याबाबत पोलिसांना निवेदन देऊन सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, नाट्यगृह परिसरात उभ्या असलेल्या वाहनात धारदार हत्यारे आढळल्याची माहिती सभागृहात पोहोचताच नगरसेवकांमध्येही खळबळ उडाली. भाजपचे नगरसेवक पवन वाळेकर आणि सचिन गुंजाळ यांनी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. नगरसेवकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने या घटनेची गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी केली.

रात्री उशिरा सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी अंबरनाथ पोलीस ठाणे गाठत या प्रकरणाची माहिती घेतली. दुसरीकडे, नगरसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत शिवसेनेच्या नगरसेवकांनीही पोलीस प्रशासनाला पत्र देऊन घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

नाट्यगृह परिसरात संशयास्पद वाहनातून हत्यारे नेमकी कोणत्या उद्देशाने आणण्यात आली होती, त्यामागे कोणाचा सहभाग आहे आणि ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, याचा तपास सूुरू असेल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475