जिल्हा

कडोंमपात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल

कडोंमपात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल
कडोंमपात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल फोटो: ठाणे वैभव

शैलेश कुलकर्णी यांच्याकडे शहर अभियंत्याचा अतिरिक्त कार्यभार

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सोमवारी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल करण्यात आले. आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वतंत्र आदेश काढून सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल तसेच कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांच्याकडे शहर अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.

शहर अभियंता अनिता परदेशी यांची इतरत्र बदली झाल्यानंतर शैलेश कुलकर्णी यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत शहर अभियंत्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यांना विद्यमान कार्यकारी अभियंता (अमृत) पदाची जबाबदारीही सांभाळावी लागणार आहे.

सहाय्यक आयुक्तांच्या फेरबदलात धनंजय थोरात यांची 3/क वरून 2/ब प्रभागात बदली करून 3/कचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे. सचिन तामखेडे यांच्याकडे परिमंडळ-2 कार्यालयाची जबाबदारी, तर अभिमान पवार यांच्याकडे 5/ड आणि उमेश यमगर यांच्याकडे 10/ई प्रभागाचा प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यभार देण्यात आला आहे. विजय भोईर यांच्याकडे 7/ह प्रभागाची, तर चंद्रकांत जगताप यांच्याकडे सामान्य प्रशासन मुख्यालयातील प्रभारी सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आरोग्य विभागातही बदल करण्यात आले असून डॉ. दीपा शुक्ला यांच्याकडे वसंत व्हॅली रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारीपदाची, तर डॉ. सपना रामोळे यांच्याकडे वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात डॉ. योगेश चौधरी आणि डॉ. सुलक्षणा त्रिभुवन यांच्या कार्यभारात अदलाबदल करण्यात आली आहे.

सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ नवीन कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच बदली अथवा कार्यभार बदलण्यासाठी राजकीय दबाव आणल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475