जिल्हा

विसर्जनवारी

विसर्जनवारी
विसर्जनवारी फोटो: ठाणे वैभव

दीड दिवसाच्या ४५ हजार श्री मूर्तींचे विसर्जन

ठाणे: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत ढोल-ताशांच्या गजरात नाचत, गुलाल उधळत ठाणे पोलिस आयुक्तालय परिसरातील सुमारे ४५ हजार दीड दिवसाच्या श्री मूर्तींना गणेश भक्तांनी भक्तीभावाने निरोप दिला.

ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत तीन ठिकाणी सार्वजनिक तर ४४,१४३ असे एकूण ४४,१४६ दीड दिवसाच्या गणरायांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. दीड दिवस भक्तांच्या घरी पाहुणचार घेत बाप्पा पुन्हा पुढच्या वर्षी येण्यासाठी निघाले.

Article Image
ठाणे, कल्याण, उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी या महापालिका क्षेत्रात गणेश विसर्जन घाट तसेच कृत्रिम घाट तयार करण्यात आले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत ५५ ठिकाणी विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत तर १८ ठिकाणी स्वीकृती केंद्र देखिल उभारण्यात आले आहेत. मासुंदा तलाव येथे कृत्रिम घाट तयार करण्यात आला आहे. रायला देवी तलाव, उपवन, खारीगाव तलाव तसेच पारसिक रेतीबंदर खाडी घाट, पूर्व ठाण्यातील खाडी किनारा, कोलशेत, गायमुख या ठिकाणी गणेश मूर्तींची विधिवत पूजाअर्चा करून बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी अनेक गणेश भक्तांचे डोळे पाणावले होते. सर्व घाटांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांनी विषेश खबरदारी घेतली होती. पोलिसांच्या मदतीला होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी होते. गणेश भक्तांना मदत करण्याचे काम सामाजिक तसेच धार्मिक संस्थांचे कार्यकर्ते करताना दिसत होते. ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखिल विसर्जन कार्यात सक्रिय होते.

भिवंडी येथील ३९ विसर्जन घाट आणि दहा स्वीकृती केंद्रांवर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कल्याण-डोंबिवली महापालिकेने ५६ ठिकाणी विसर्जन घाट तयार केले आहेत तर २६ ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे उभारली होती. उल्हासनगर महापालिकेने ४३ ठिकाणी विसर्जन घाट आणि १२ ठिकाणी स्वीकृती केंद्रे उभारली होती.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475