जिल्हा

राष्ट्रीय लोक अदालतीत १०० कोटींहून अधिक रकमेची तडजोड

राष्ट्रीय लोक अदालतीत १०० कोटींहून अधिक रकमेची तडजोड
राष्ट्रीय लोक अदालतीत १०० कोटींहून अधिक रकमेची तडजोड फोटो: ठाणे वैभव

ठाणे जिल्हा राज्यात प्रथम

ठाणे: १२ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या वर्षातील तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात ठाणे जिल्ह्याने सलग सहाव्या वेळेस राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या लोकअदालतीत विक्रमी एकूण ८८,७३३ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले असून, याद्वारे तब्बल एक अब्ज ४९ कोटी ७२ लाख ४०,९४७ रुपयांची विक्रमी तडजोड करण्यात आली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रविंद्र एस. पाजणकर यांनी ही माहिती दिली आहे.

लोक अदालतीत प्रलंबित २०,६३१ आणि दावा दाखलपूर्व ६८,१०२ अशा एकूण ८८,७३३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ३० वर्षे, २० वर्षे, १० वर्षे आणि पाच वर्षे जुनी प्रलंबित असणारी एकूण ७०१ अत्यंत जुनी प्रकरणे यशस्वीरीत्या निकाली काढण्यात आली.

मोटार अपघाताच्या नुकसान भरपाईची ३५७ प्रकरणे सामंजस्याने मिटून, पीडितांना व वारसांना एकूण ४६ कोटी ४८ लाख ७९,३१२ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. यामध्ये बेलापूर येथील एका प्रकरणात दोन कोटी ४० लाख रुपये आणि ठाणे येथील एका प्रकरणात दोन कोटी रुपयांची उच्चतम तडजोड झाली. कौटुंबिक न्यायालयातील वैवाहिक वादाच्या ४७ प्रकरणांमध्ये यशस्वी समेट घडवून आणण्यात आला, त्यापैकी पाच प्रकरणांत पती-पत्नी पुन्हा एकत्र गुण्यागोविंदाने नांदावयास गेले. चेक बाऊन्स प्रकरणांत कायद्यांतर्गत जुनी प्रलंबित २,१०६ प्रकरणे निकाली निघून त्यात ३६ कोटी ५४ लाख ७०,८७८ रुपयांची तडजोड झाली. किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणांमध्ये १४,७१७ आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबूल करून एक कोटी ६३ लाख ९१,०३९ रुपयांची दंडाची रक्कम जमा केली. तसेच प्रॉपर्टी टॅक्स व रेव्हेन्यूची दाखलपूर्व ६५४ प्रकरणे निकाली निघून ३९ लाख ४९,३८३ रुपयांची तडजोड झाली.

समाधानाची आणि पहिल्यांदाच घडलेली बाब म्हणजे एका प्रकरणात 76 वर्षीय वृद्ध महिलेला अवघ्या सहा दिवसांत न्याय मिळाला. अपघातात जखमी झालेल्या रेखा अहुजा यांनी 7 सप्टेंबर रोजी ई- प्रणालीच्या माध्यमातून भरपाई मिळण्यासाठी ऑनलाइन दावा दाखल केला होता. त्या दाव्याचा अवघ्या सहा दिवसांत निकाल देऊन पीडीतेला सहा लाख 20 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली. अहुजा यांच्यावतीने वकील सुहासिनी नावडकर यांनी बाजू मांडली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475