जिल्हा

राजकीय शुभेच्छांच्या नावाखाली शहराचे विद्रूपीकरण

राजकीय शुभेच्छांच्या नावाखाली शहराचे विद्रूपीकरण
राजकीय शुभेच्छांच्या नावाखाली शहराचे विद्रूपीकरण फोटो: ठाणे वैभव

ठाणे: ठाण्याच्या रस्त्यांवर बॅनरचे जंगल फोफावत असताना शहराच्या सौंदर्याला राजकीय शुभेच्छांच्या फलकांनी गालबोट लागले आहे. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या या बॅनरबाजीला आळा घालण्याची मागणी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचली असून, मुख्यमंत्री सचिवालयाने निवेदनाची दखल घेत ते पुढील कार्यवाहीसाठी नगर विकास (२) विभागाकडे वर्ग केले आहे.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि नववर्षाच्या निमित्ताने शहरातील चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राजकीय बॅनर झळकतात. शुभेच्छांच्या नावाखाली होणारे हे शक्तिप्रदर्शन शहराच्या सौंदर्याला बाधा आणत असून ‘शहर कुणाचे ठाणेकरांचे की बॅनरबाजांचे?’ असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेकडून अनधिकृत बॅनर हटविण्याची कारवाई केली जाते; मात्र काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी बॅनर दिसू लागतात. त्यामुळे ‘कारवाई कागदावर आणि बॅनर रस्त्यावर’ अशी अवस्था झाली आहे. सामान्य नागरिकांवर तत्काळ कारवाई होत असताना राजकीय बॅनरबाजीबाबत नरमाई का, असा सवालही उपस्थित होत आहे.

अनधिकृत फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण तर होतेच; शिवाय वाहतुकीला अडथळा आणि बॅनर कोसळून जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे बॅनर लावणाऱ्यांबरोबरच संबंधित राजकीय व्यक्तींवरही कारवाई करावी, तसेच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विशेष बॅनरविरोधी पथके तैनात करून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई करावी आणि कारवाईची माहिती सार्वजनिक करावी, अशीही मागणी आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाच्या दखलीनंतर आता ठाणे महापालिका प्रशासन बॅनरबाजीवर खरोखरच कठोर कारवाई करणार की पुन्हा केवळ दिखाऊ मोहीम राबवणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475