देश-विदेश
उत्तरकाशीत ढगफुटीने गावं वाहून गेली
उत्तरकाशीत ढगफुटीने गावं वाहून गेली
फोटो: ठाणे वैभव
मोठ्या जीवितहानीचा अंदाज
डेहराडून: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये निसर्गाचे आक्राळविक्राळ रुप पाहायला मिळत आहे. ढगफुटीसारख्या अस्मानी संकटामुळे संपूर्ण धारली गावच वाहून गेले आहे.
हर्षिल येथील भारतीय लष्कराच्या छावणीलाही याचा तडाखा बसला आहे. धारली गावातील प्रलयानंतर १० मिनिटांच्या वेळेतच लष्कराचे पथक तेथे पोहोचले आणि तातडीने बचावकार्य सुरु केले. लष्कराच्या पथकाला २० गावकऱ्यांना तरी जीवघेण्या प्रलयातून वाचवण्यात यश आले. पण दुसरीकडे मात्र हर्षिल आर्मी कॅम्प परिसरात ढगफुटी झाल्यानंतर ८ ते १० सैनिक बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
भारतीय लष्कराचे ब्रिगेड कमांडर ब्रिगेडियर मनदीप ढिल्लन यांनी माहिती दिली की, दुपारी १:४५ वाजता धारली गावात ढगफुटीमुळे ही दुर्घटना घडली. हे गाव हर्षितच्या उत्तरेस सुमारे चार किमी अंतरावर आहे आणि गंगोत्रीच्या मार्गावर आहे. भारतीय लष्कर हर्षिलमध्ये तैनात आहे आणि सैनिकांनी १० मिनिटांत धारली गावात पोहोचत बचावकार्य सुरू केले.
ढिल्लन असेही म्हणाले की, सुमारे १५० सैनिक, विशेष वैद्यकीय उपकरणे, बचाव उपकरणे आणि डॉक्टर बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. पण यातत हर्षिल येथील लष्करी छावणीत ढगफुटी झाली, परंतु लष्कर या परिस्थितीचा सामना करत आहे. नागरिकांच्या मदत आणि बचाव कार्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
दरम्यान, या आपत्कालीन परिस्थितीसाठी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर देखील सज्ज आहेत. सारसव, चंदीगड आणि बरेली हवाई तळांवरून २ चिनूक, २ एमआय-१७व्ही५, २ चित्ता आणि एक एएलएच बचाव कार्यासाठी तैनात आहेत. सध्या हवामानातील अनिश्चिततेमुळे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नाहीत. हवाई दलाचे हेलिकॉप्टर त्यांच्या तळांवरून हर्षिल येथे जातील आणि नंतर गरजेनुसार बचाव कार्यात गुंततील.
हर्षिल आर्मी कॅम्पचा एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये प्रलयकारी दृश्य दिसत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की जवळजवळ संपूर्ण छावणीचे दगड पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत. सैनिकांपासून ते इतर स्तरांपर्यंत या छावणींचे किती नुकसान झाले आहे, याबाबत अद्याप कळू शकलेले नाही. यातच एक व्यक्ती नदीच्या काठावर असलेल्या जोरदार प्रवाहांचा व्हिडिओ बनवताना दिसत आहे.
300x450
300x600