जिल्हा

मेट्रोच्या कामाची सळई थेट रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली

मेट्रोच्या कामाची सळई थेट रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली
मेट्रोच्या कामाची सळई थेट रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली फोटो: ठाणे वैभव
भिवंडी: भिवंडीत मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. मंगळवारी दुपारी मेट्रोच्या कामावरील सळई थेट रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी सध्या चौकशी सुरू आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गिकेच्या निर्माणादरम्यान नारपोली धामणकर नाका परिसरात घटना घडली आहे. सळई रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नारपोली धामणकर नाका या महत्त्वाच्या मार्गावर हे काम सुरु आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. कोणतीही सुरक्षाजाळी न बसवता काम सुरू होते. घडलेल्या प्रकारानंतर लोकांनी आता मेट्रोच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणादरम्यान यापूर्वी अनेक अपघात झाल्याची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी मेट्रोचा पत्रा अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. तीन हात नाका येथे गर्डरवरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475