जिल्हा

क्लस्टर योजनेत गावठाण; सत्ताधाऱ्यांनीच उठवले रान!

क्लस्टर योजनेत गावठाण; सत्ताधाऱ्यांनीच उठवले रान!
क्लस्टर योजनेत गावठाण; सत्ताधाऱ्यांनीच उठवले रान! फोटो: ठाणे वैभव

* महासभेत सत्ताधारी पक्षाला घरचा आहेर

* नगरसेवकांनी केली गावठाण वगळण्याची मागणी

ठाणे: राज्य शासनाच्या निर्णयानंतर ठाण्यातील गावठाण भाग क्लस्टर योजनेतून वगळण्यात आले असतानाही त्याचा समावेश पुन्हा महापालिकेच्या योजनेत केल्याने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच प्रशासनाला धारेवर धरत क्लस्टर योजनेतून गावठाण वगळण्याची मागणी केली.

ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या सभेत शहरविकास विभागाने क्लस्टर बाबतच्या एसओपीचे सादरीकरण केले. क्लस्टर योजना रबविण्यात आली तर शहराचा सर्वांगीण विकास होईल असा दावा प्रशासनामार्फत नगर संचालक कुणाल मुळे यांनी केला. इतर योजना राबविल्यास फक्त इमारतींचा विकास होतो, परंतु क्लस्टर योजना राबविल्यास पाणी, मलनिस्सारण, रस्ते, खेळाची मैदाने आणि इतर मनोरंजनाच्या गोष्टी, मार्केट इत्यादी सुविधा मिळत असल्याचे श्री.मुळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी शहरात ५१ ठिकाणी क्लस्टर योजना राबविण्यात येणार असून प्राधान्याने सहा ठिकाणच्या क्लस्टर योजनांना सुरुवात झाल्याचे सांगितले.

या चर्चेच्या दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी गावठाण भागात क्लस्टर योजना राबविण्यास विरोध केला. यापूर्वी गावठाण क्लस्टरमधून वगळण्यात आले असताना पुन्हा त्यांचा समावेश या योजनेत का केला? मंत्री गणेश नाईक यांनी क्लस्टर योजनेला पाठिंबा दिला होता, त्यामुळे निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. ठाणे महापालिका क्षेत्रातील गावठाणांचा विकास भूमिपुत्र करतील. क्लस्टर योजनेला गावकऱ्यांचा विरोध आहे, त्यामुळे गावठाण भागात ही योजना राबवू नये, अशी त्यांनी मागणी केली. त्यांच्या या मागणीला ज्येष्ठ नगरसेवक रमाकांत मढवी, अनिता गौरी, भाजपाच्या अर्चना मणेरा, सेनेचे, देवराम भोईर, उषा भोईर यांनी देखिल विरोध केला. या चर्चेला उत्तर देताना महापालिका प्रशासनाने यापूर्वी गावठाण वगळले असेल तर त्याचा या योजनेत समावेश केला जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475