महाराष्ट्र

आज दिवा-मुंब्रा प्रभागातील अनधिकृत नळ जोडण्या तोडणार

आज दिवा-मुंब्रा प्रभागातील अनधिकृत नळ जोडण्या तोडणार
आज दिवा-मुंब्रा प्रभागातील अनधिकृत नळ जोडण्या तोडणार फोटो: ठाणे वैभव
काही क्षेत्रात आठ तास पाणी बंद ठेवणार ठाणे : दिवा प्रभाग क्षेत्रात शीळ, खर्डी आणि भोलेनाथ नगर तसेच, मुंब्रा प्रभाग क्षेत्रातील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्निशमन केंद्रापर्यंतच्या भागात गुरूवार, ९ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या आठ तासांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवर भोलेनाथ नगर गेट समोरील नाल्यातील ६६० मीमी व्यासाच्या जलवाहिनीवरील अनधिकृत नळ संयोजन खंडित करणे आणि कल्याण फाटा जलकुंभाकडे जाणाऱ्या जलवाहिनीवरील ३५० मी मी व्यासाच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करणे या कामांसाठी गुरूवार, ९ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या आठ तासात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण फाटा येथून एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून होणारा पाणी पुरवठा या काळात खंडित राहणार आहे. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पुढील दोन दिवस या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणी साठा करून ठेवावा, तसेच, पाण्याचा अपव्यय टाळून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475