महाराष्ट्र

आठवड्याभरात २४४ किलो प्लास्टिक जप्त, ५० हजारांचा दंड

आठवड्याभरात २४४ किलो प्लास्टिक जप्त, ५० हजारांचा दंड
आठवड्याभरात २४४ किलो प्लास्टिक जप्त, ५० हजारांचा दंड फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: यामध्ये परिमंडळ 2 च्या प्लास्टिक विरोधी विशेष भरारी पथकाने उपआयुक्त चंद्रकांत तायडे यांच्या नियंत्रणाखाली ऐरोली सेक्टर 8 ए येथे प्रतिबंधात्मक प्लास्टिक वितरण करणा-या एका टेम्पोवर धाड टाकत साधारणत: 225 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त केला तसेच संबंधितांकडून पाच हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. 1 मे पासून आठवड्याभरात बेलापूर विभागात तीन व्यावसायिक आणि आस्थापनांवर कारवाई करीत 15 हजार रुपये दंडात्मक रक्कम आणि 10 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. वाशी विभागात एका व्यावसायिकावर कारवाई करीत पाच हजार रुपये दंडात्मक रक्कम आणि एक किलो एकल वापर प्लास्टिकची जप्ती केली. कोपरखैरणे विभागातही एका दुकानदाराकडून पाच हजार रुपये दंड वसूली आणि दीड किलो प्लास्टिक जप्ती करण्यात आली. परिमंडळ 1 च्या प्लास्टिकविरोधी भरारी पथकाने एका व्यावसायिकावरील कारवाईत पाच हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूली आणि एक किलो एकल वापर प्लास्टिकचा साठा जप्त केला. परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने चार व्यावसायिकांवर कारवाई करीत 20 हजार रुपये दंड वसूली आणि 230 किलो 600 ग्रॅम इतके प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले आहे. अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आठवड्याभरात 10 दुकाने आणि आस्थापना यांच्याकडून 50 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूली तसेच 244 किलो 100 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे. या कारवाईत डी.आर.पाटील, वसंत बाविस्कर, महेश पाटील, अनिकेत म्हात्रे या महापालिका कर्मचा-यांनी चांगले काम केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475