महाराष्ट्र

जिल्हा परिषद अन् पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य

जिल्हा परिषद अन् पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य
जिल्हा परिषद अन् पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य फोटो: ठाणे वैभव
कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब मुंबई: आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य असणार आहेत. राज्य मंत्रिमंडळात या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या 10 टक्के तर पंचायत समितीत सदस्य संख्येमागे 20 टक्के सदस्य निवडता येणार असल्याची माहिती आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या 10 टक्के तर पंचायत समितीत सदस्य संख्येमागे 20 टक्के सदस्य निवडता येणार असल्याची माहिती आहे. किमान पाच सदस्य निवडणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात लवकरच विधिमंडळात कायदा पारीत केला जाणार असल्याची माहिती आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वीकृत सदस्यसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. ग्रामीण राजकारणाच्या दृष्टीने सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतर्गत जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीमध्ये दोन सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी यापूर्वीच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, आता राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. ग्रामीण भागात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या, परंतु निवडणूक लढविण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल, या उद्देशाने महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता इच्छुक कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभागृहात बसण्याची संधी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600