जिल्हा

डोंबिवलीतील फेरीवाला हटाव पथकाचे दोन कामगार निलंबित

डोंबिवलीतील फेरीवाला हटाव पथकाचे दोन कामगार निलंबित
डोंबिवलीतील फेरीवाला हटाव पथकाचे दोन कामगार निलंबित फोटो: ठाणे वैभव
कल्याण : पालिकेच्या ग, फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगारांनी कामात हेळसांड केल्याने आयुक्त अभिनव गोयल यांनी ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. कमलाकर सोनावणे आणि रवी बर्वे अशी निलंबित केलेल्या कामगारांची नावे आहेत. पालिका उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील दोन कामगारांना आयुक्तांनी अन्य प्रभागात कामासाठी नियुक्त केले. मागील तीस वर्षाच्या कालावधीत प्रथमच डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटविण्याची आक्रमक कार्यवाही पालिकेच्या फ आणि ग प्रभागाकडून सुरू आहे. फ प्रभागातील फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, इंदिरा चौक भागातील फेरीवाले, मानपाडा रस्त्यावरील फेरीवाला बेकायदा बाजार हटविण्यात अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर, फ प्रभागाचे सहायक आयुक्त प्रसाद ठाकुर यांना यश आले आहे. डोंबिवली पूर्व ग प्रभागातील डाॅ. राॅथ रस्ता, पाटकर रस्ता, कामत मेडिकल गल्ली, उर्सेकरवाडी गल्ली आणि भाजी मंडई, रामनगर रेल्वे तिकीट खिडकी, वाहतूक कार्यालय, राजाजी रस्ता भागातील फेरीवाले हटण्यास तयार नाहीत. या पथकातील काही कामगार आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याच्या तक्रारी आयुक्त, उपायुक्तांना प्राप्त होत आहेत. स्थानिक, नगरसेवकांकडूनही याबाबत लक्ष वेधण्यात आले. कामगार आणि फेरीवाल्यांमध्ये होत असलेल्या समन्वयाविषयी काही दृश्यचित्रफिती वरिष्ठांना मिळाल्या होत्या. यामुळे प्रशासनाने दोघांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. या नोटिसांना समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने आयुक्त गोयल यांनी निलंबनाची कारवाई केली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475