जिल्हा

महसूलवाढीसाठी अधिकाऱ्यांना ठामपा आयुक्तांच्या कडक सूचना

महसूलवाढीसाठी अधिकाऱ्यांना ठामपा आयुक्तांच्या कडक सूचना
महसूलवाढीसाठी अधिकाऱ्यांना ठामपा आयुक्तांच्या कडक सूचना फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या महसूल उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी सर्व विभागप्रमुखांची सविस्तर आढावा बैठक घेतली. प्रत्येक विभागाने निश्चित महसूल उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करून परिणामकारक कामगिरी करावी, असे कडक निर्देश त्यांनी दिले. माजिवडा येथील अर्बन रिसर्च सेंटरमध्ये झालेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीत थकबाकी वसुली, चालू आर्थिक वर्षातील उत्पन्न, मागील वर्षाच्या तुलनेतील कामगिरी, प्रभागनिहाय लक्ष्यपूर्ती, प्रलंबित प्रकरणे, ज्यांची मालमत्ता कराची थकबाकी आहे ती वसूल करणे, ज्या मालमत्तांची कर आकारणी झालेली नाही त्यांना कर आकारणी करणे, अनधिकृत बांधकामे आणि महसूल वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक प्रभागासाठी निश्चित करण्यात आलेल्या महसूल वसुलीच्या उद्दिष्टांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. प्रभागनिहाय विशेष कृती आराखडा तयार करून त्याचा नियमित आढावा घेण्यासह थकबाकीदारांकडून वसुलीवर विशेष भर देण्यास त्यांनी सांगितले. याशिवाय विशेष वसुली मोहीम, डिजिटल प्रक्रिया आणि ऑनलाइन प्रणालीचा अधिकाधिक वापर करून कार्यक्षमता वाढविण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. महसूल वसुलीतील अडथळे तातडीने दूर करून प्रत्येक विभागाने निश्चित कालमर्यादेत उद्दिष्टपूर्ती करावी. प्रभागनिहाय सातत्याने आढावा घेत अपेक्षित महसूल संकलन साध्य करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले. ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात प्रत्येक विभागाला देण्यात आलेल्या महसुली उत्पन्नाच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करत असताना विभागांना येत असलेल्या अडचणी व समस्या जाणून घेत असतानाच आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475