जिल्हा

घराच्या छतावर 'विषारी दारू'ची भट्टी !

घराच्या छतावर 'विषारी दारू'ची भट्टी !
घराच्या छतावर 'विषारी दारू'ची भट्टी ! फोटो: ठाणे वैभव
भाईंदर : भाईंदर पश्चिमेकडील राई गावात एका निवासी घराच्या छतावर छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने हा छापा टाकून हजारो रुपयांचे रसायन व तयार दारू जप्त करून नष्ट केली. राई गावातील विश्वनाथ पाटील यांच्या घराच्या गच्चीवर पोलिसांची नजर चुकवून बेकायदेशीर दारू गाळली जात असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रात्रीच्या सुमारास या घरावर अचानक धाड टाकली. पोलिसांना चकवण्यासाठी आरोपीने दुर्गम भागाऐवजी थेट लोकवस्तीतील घराच्या छताचा वापर केला होता. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून दारू तयार करण्याचे साहित्य, गॅस सिलिंडर, पिंप आणि कच्चे रसायन जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी फरार असलेल्या व भट्टी चालविणाऱ्या मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475