जिल्हा

अंबरनाथ कॉलेजचे १०० डॉक्टर मध्यवर्ती रुग्णालयात देणार सेवा

अंबरनाथ कॉलेजचे १०० डॉक्टर मध्यवर्ती रुग्णालयात देणार सेवा
अंबरनाथ कॉलेजचे १०० डॉक्टर मध्यवर्ती रुग्णालयात देणार सेवा फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगरवासींना मिळणार दर्जेदार आणि अत्याधुनिक सेवा ​उल्हासनगर : अंबरनाथ येथील मेडिकल कॉलेजचे डॉक्टर आणि शिक्षकांचा उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात सेवा देण्याचा रखडलेला मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरसह परिसरातील रुग्णांना दर्जेदार आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे. माजी आमदार पप्पू कलानी यांच्या प्रभावी मध्यस्थीनंतर येत्या आठवडाभरात या मेडिकल कॉलेजचे १४ तज्ञ शिक्षक आणि सुमारे १०० शिकाऊ डॉक्टर मध्यवर्ती रुग्णालयात रुजू होणार आहेत. उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील २०२ रुग्णशय्यांची मान्यता असून येथील डॉक्टर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात सेवा देत होते. आरोग्य सभापती सविता तोरणे व शिवाजी रगडे यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर पप्पू कलानी यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, डीन डॉ. संजय वर्मा आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला. ​समन्वय वाढवण्यासाठी मेडिकल कॉलेजच्या डीनसाठी मध्यवर्ती रुग्णालयातच जागा निश्चित करण्यात आली असून, डीन वर्मा यांनी रुग्णालयाची पाहणी करून जागेची निश्चिती केली आहे. तसेच मेडिकल कॉलेजला उपलब्ध होणाऱ्या निधीतून मध्यवर्ती रुग्णालयात सुसज्ज आयसीयू, एमआरआय, सीटी स्कॅन आणि लहान मुलांसाठी 'एसएससी' युनिट यांसारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू करण्याची तयारी डीन वर्मा यांनी दर्शवली आहे. या सर्व सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाल्यामुळे गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी मुंबई किंवा कळव्याला पाठवण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475