जिल्हा

यावर्षी हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी

यावर्षी हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी
यावर्षी हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी फोटो: ठाणे वैभव

ठाणे : यावर्षी हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आले आहेत. यापूर्वी सन २०००, २००६ आणि २००९ मध्ये हरतालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी आले होते. यानंतर सन २०३२ मध्येही असाच योग येणार आहे  असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

यावर्षी सोमवार १४ सप्टेंबर रोजी श्रीगणपती बाप्पांचे आगमन होत आहे. सोमवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी भाद्रपद शुक्ल तृतीया संपते आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुरू होते. सूर्योदयी भाद्रपद शुक्ल तृतीया असल्याने हरतालिका पूजन त्या दिवशी करावयाचे आहे आणि मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्यामुळे श्रीगणेशमूर्ती स्थापना आणि पूजन त्याच दिवशी करावयाचे आहे.

याविषयी अधिक माहिती देताना श्री.सोमण म्हणाले, हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी ही दोन्ही व्रते भिन्न असल्याने कोणतीही पूजा अगोदर किंवा नंतर केली तरी चालेल. सोमवारी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी भाद्रपद शुक्ल तृतीया संपत असली तरी त्या दिवशी हरतालिका पूजा सूर्योदयापासून मध्यान्हकालापर्यंत म्हणजे दुपारी १.४८ पर्यंत केली तरी चालेल. 

हरतालिकेचा  उपवास मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी सोडावयाचा आहे. जर कोणी ऋषिपंचमीचा उपवास करीत असेल तर अन्नाचा वास घेऊन उपवास सोडता येतो आणि ऋषिपंचमीचा उपवास चालू ठेवता येऊ शकेल.

सोमवार १४ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्याने त्याच दिवशी श्रीगणेश चतुर्थी आहे. श्रीगणेशमूर्ती स्थापना आणि श्रीगणेश पूजन सकाळी ११.२१ ते दुपारी १.४८ या मध्यान्हकाळी करावयाचे आहे. जर ही वेळ शक्य नसेल तर पहाटे उष:कालापासून दुपारी मध्यान्हकाल संपपर्यंत म्हणजे दुपारी १.४८ पर्यंत श्रीगणेशमूर्ती स्थापना आणि गणेश षोडशोपचार पूजन करावयाचे आहे,असेही श्री.दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475