जिल्हा

गणेश विसर्जनाला ठाण्यात अवजड वाहनांना प्रवेश बंद

गणेश विसर्जनाला ठाण्यात अवजड वाहनांना प्रवेश बंद
गणेश विसर्जनाला ठाण्यात अवजड वाहनांना प्रवेश बंद फोटो: ठाणे वैभव

ठाणे : गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुका आणि भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी तसेच अनुचित घटना टाळण्यासाठी ठाणे शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण ह्यांनी अधिसूचना जारी केली आहे.

येत्या १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत असून, दीड, पाच, गौरी-गणपती, सात दिवसांचे गणपती तसेच अनंत चतुर्दशीच्या विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघणार आहेत. या काळात रस्त्यांवर मोठा जनसमुदाय असणार असल्याने जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ठाणे शहर वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रातील मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

ठाणे शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग आणि एका राज्य महामार्गाची वाहतूक सुरू असते. बाहेरील राज्यांतून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांचीही मोठी संख्या असल्याने गणेशोत्सव काळात वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यंदा दीड दिवसांचे गणपती विसर्जन १५ सप्टेंबर, पाच दिवसांचे गणपती १८ सप्टेंबर, गौरी- गणपती विसर्जन १९ सप्टेंबर आणि सात दिवसांचे गणपतीचे विसर्जन २० सप्टेंबर या दिवशी आहे. त्यामुळे मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड माल वाहनांना ठाणे शहरातील मार्गांवरून जाण्यास प्रवेश बंद राहणार आहे. तसेच २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री १२.०१ वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत अवजड वाहनांवर निर्बंध लागू राहतील.

दरम्यान, १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान विसर्जनाचे दिवस वगळता इतर दिवशी रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अवजड वाहनांना वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. अशी माहिती वाहतुक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

 या दिवशी प्रवेश बंद 

१५ सप्टेंबर: रात्री १२.०१ पासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत

१८ सप्टेंबर: रात्री १२.०१ पासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत

१९ सप्टेंबर: रात्री १२.०१ पासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत

२० सप्टेंबर: रात्री १२.०१ पासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत

२५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी): रात्री १२.०१ ते २६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेपर्यंत

इतर दिवस: रात्री १२ ते सकाळी ६ अवजड वाहनांना वाहतुकीस मुभा

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475