जिल्हा

अर्जुन बिराजदारला तिहेरी मुकुट, बिराजदार बंधूंना दुहेरी मुकुट

अर्जुन बिराजदारला तिहेरी मुकुट, बिराजदार बंधूंना दुहेरी मुकुट
अर्जुन बिराजदारला तिहेरी मुकुट, बिराजदार बंधूंना दुहेरी मुकुट फोटो: ठाणे वैभव

आंतरराज्य स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीला पाच सुवर्ण आणि एक एक कांस्य

ठाणे : बिलासपूर, छत्तीसगड येथे पार पडलेल्या मानाच्या 'पश्चिम विभागीय आंतरराज्य वैयक्तिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत' ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या शटलर्सनी निर्विवाद वर्चस्व गाजवत पाच सुवर्ण आणि एका कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

या स्पर्धेत महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा या राज्यांमधील अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील एकूण १० क्रीडा प्रकारांपैकी तब्बल पाच प्रकारांत ठाणे अकॅडमीच्या खेळाडूंनी अजिंक्यपदे पटकावून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

या स्पर्धेत ठाणे अकॅडमीचा युवा खेळाडू अर्जुन बिराजदार याने तिहेरी मुकुट पटकावण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला, तर अर्जुन आणि आर्यन या बिराजदार बंधूंनी मिळून दुहेरी मुकुट आपल्या नावावर केला. वरिष्ठ पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत द्वितीय मानांकित अर्जुन बिराजदार आणि आर्यन बिराजदार या बंधूंच्या जोडीने नैवेद्य तोंडे व रुद्र ठाकूर जोडीचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर १९ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटातही अव्वल मानांकित अर्जुन आणि आर्यन जोडीने याच प्रतिस्पर्धी जोडीवर पुन्हा मात करत दुसरे सुवर्णपदक जिंकले आणि दुहेरी मुकुटावर आपले नाव कोरले. याशिवाय १९ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात अर्जुन बिराजदार याने ठाण्याच्या सिया वायदंडे हिच्या साथीने अव्वल मानांकित सार्थक कांत थॉमस व इशिका पोद्दार जोडीचा अंतिम सामन्यात पराभव करून सुवर्णपदक मिळवले. एकाच स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकून अर्जुन बिराजदार याने तिहेरी मुकुट पटकावण्याचा दुर्लभ पराक्रम साकारला.

वरिष्ठ मिश्र दुहेरीत द्वितीय मानांकित सर्वेश महेश यादव याने नेहल गोसावीसह खेळताना अंतिम सामन्यात अव्वल मानांकित सौरभ साहू व हिरल चौहान या जोडीवर मात करत सुवर्णपदक पटकावले. तसेच वरिष्ठ महिला दुहेरीत अव्वल मानांकित अनघा करंदीकर हिने नेहल गोसावीच्या साथीने द्वितीय मानांकित आशिता दुबे व स्वाती सोलंकी या जोडीचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. वरिष्ठ पुरुष एकेरी गटात सर्वेश यादव याने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारत कांस्यपदक संपादन केले. अकॅडमीच्या खेळाडूंनी मिळवलेल्या या ५ सुवर्ण आणि १ कांस्यपदकामुळे पश्चिम विभागातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्राचा आणि ठाण्याचा दबदबा निर्माण झाला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475