जिल्हा
कोपरखैरणेत तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला
कोपरखैरणेत तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर 18 मध्ये प्लॉट क्र. 14 येथील अथर्व सोसायटीमधील तिस-या मजल्यावरील एका सदनिकेचा स्लॅब बुधवरी कोसळून खालच्या मजल्यावरील सदनिकेत कोसळला.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणास दुखापत झालेली नाही. मात्र रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फत रहिवाशांसाठी सेक्टर 5 कोपरखैरणे येथील अण्णासाहेब पाटील सभागृहामध्ये तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली. इमारतीचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. रहिवाशांना बाहेर काढून इमारत सील करण्यात आलेली असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475