जिल्हा

माथाडींच्या ३५०० धोकादायक घरांचा पुनर्विकास होणार!

माथाडींच्या ३५०० धोकादायक घरांचा पुनर्विकास होणार!
माथाडींच्या ३५०० धोकादायक घरांचा पुनर्विकास होणार! फोटो: ठाणे वैभव
* घणसोलीतील सिम्प्लेक्स सोसायटीसाठी क्लस्टरला मंजुरी * उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली * खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई: माथाडी कामगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या घणसोलीतील सिम्प्लेक्स सोसायटीच्या विकासासाठी क्लस्टरला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या सोसायटीमध्ये वास्तव्य करणार्‍या माथाडी कामगारांच्या साडेतीन हजार घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वन रूम किचनच्या घरात वास्तव्य करणार्‍या या कुटूंबांना आता टूबीएचकेचे प्रशस्त घर मिळणार आहे. सिम्प्लेक्सचा पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. घणसोली येथील सेक्टर ७ मध्ये सिम्प्लेक्स सोसायटी ही माथाडी कामगारांची मोठी वस्ती आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे या वसाहतीमधील घरे धोकादायक बनली आहेत. पिलर आणि भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत. दररोज छताचे प्लास्टर पडल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांना आणि त्यांच्या कुटूंबांना जीव मुठीत धरून येथे वास्तव्य करावे लागत आहे. त्यामुळे या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याची मागणी केली. यासाठी रहिवाशांनी अनेक आंदोलनेही छेडली. मात्र हा पुनर्विकास राजकीय श्रेयवादात अडकला. त्यामुळे माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांची मृत्युच्या दाढेतून सुटका झाली नाही. मात्र खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी गोरगरीब माथाडी कामगारांना हक्काचा पक्का आणि मोठा निवारा मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. माथाडी कामगारांच्या या वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना जाहीर करण्यात आली आहे. क्लस्टरची अधिसूचना आज महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी प्रसिध्द केली. त्यामुळे गेल्या सिम्प्लेक्सचा पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून साडेतीन हजार घरांमध्ये वास्तव्य करणार्‍या सुमारे १६ हजार रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475