जिल्हा

टिटवाळ्यात नाल्याच्या पाण्याने नागरिकांचे हाल

टिटवाळ्यात नाल्याच्या पाण्याने नागरिकांचे हाल
टिटवाळ्यात नाल्याच्या पाण्याने नागरिकांचे हाल फोटो: ठाणे वैभव
रस्त्यावरून थेट घर-दुकानांत शिरले सांडपाणी

कल्याण: मांडा-टिटवाळा परिसरातील नांदप रोड येथील इंदिरा नगरमध्ये नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरत असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होत असून, आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

रस्त्याच्या कामादरम्यान करण्यात आलेल्या भरावामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावर साचून ते थेट घर-दुकानांमध्ये शिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक रहिवासी मंगेश कचरे यांच्या घरासह दुकानात सांडपाणी शिरल्याने साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सांडपाणी घरात शिरल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे.

प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश  शिळकंदे आणि दिलीप राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नाल्याचे पाणी रस्त्यावर येण्याची परिस्थिती तसेच त्याचा नागरिकांच्या घर-दुकानांवर होणारा परिणाम त्यांनी जाणून घेतला.

यावेळी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली. रस्त्याच्या कामामुळे नाल्याचा प्रवाह अडला असल्यास तो तातडीने मोकळा करावा आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली.

नाल्याचा प्रवाह सुरळीत करून नागरिकांना तातडीने दिलासा न दिल्यास मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा दिला. रस्त्याच्या कामाचे नियोजन, निचरा व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475