देश-विदेश

सलग पाच दिवस बँका बंद?

सलग पाच दिवस बँका बंद?
सलग पाच दिवस बँका बंद? फोटो: ठाणे वैभव
नवी दिल्ली: देशभरातील बँक कर्मचारी २८ सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान देशव्यापी बँक संपाची हाक दिली आहे.

या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना महत्त्वाचे बँकिंग व्यवहार आधीच पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. विशेष म्हणजे, २६ आणि २७ सप्टेंबरला शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने ग्राहकांना सलग पाच दिवस शाखांमधील सेवांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. याबद्दल सविस्तर वृत्त एका राष्ट्रीय दैनिकाने दिले आहे.

एसबीआयने म्हटले आहे की, संपामुळे शाखांमधील बँकिंग सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाऊन व्यवहार करायचे आहेत किंवा एखादा व्यवहार वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, त्यांनी तो संप सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करावा.

पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा. पेन्शनच्या लाभांमध्ये सुधारणा आणि अद्ययावत बदल करावेत. सर्व पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याचे एकसमान सूत्र लागू करावे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याचा पर्याय द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

पीटीआयच्या वृत्तानुसार, ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’कडून देशातील सुमारे ९० टक्के बँकिंग कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच मागण्यांसाठी बँक संघटनांनी यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप केला होता.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475