जिल्हा

ठाण्याचा पाणीप्रश्न सुटणार?

ठाण्याचा पाणीप्रश्न सुटणार?
ठाण्याचा पाणीप्रश्न सुटणार? फोटो: ठाणे वैभव

मुंबईच्या मनोरी प्रकल्पातून १०० एमएलडी पाण्यासाठी ठाणे महापालिकेचा पुढाकार

निःक्षारीकरण प्रकल्पाच्या खर्चाचा वाटा उचलण्यास ठामपाची तयारी; मुंबई पालिकेकडे पाठवला अधिकृत प्रस्ताव

ठाणे: ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील तीव्र पाणीटंचाईचा विचार करता, ठाणे महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यासाठी एक महत्त्वाचे आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. मुंबई महापालिकेच्या मनोरी येथे प्रस्तावित असलेल्या 'समुद्राचे पाणी गोडे करणाऱ्या' (निःक्षारीकरण) प्रकल्पातून ठाण्यासाठी दररोज १०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने मुंबई महापालिकेकडे मांडला आहे.

विशेष म्हणजे, या अतिरिक्त १०० एमएलडी पाण्यासाठी लागणारा भांडवली आणि महसुली खर्च स्वतः उचलण्याची तयारी ठाणे पालिकेने दर्शवली आहे. सध्याच्या उपलब्ध जलस्रोतांवर प्रचंड ताण येत असून शासनाकडून तातडीने अतिरिक्त पाणी मिळण्यात मर्यादा आहेत. त्यामुळे ठाणे पालिकेने तांत्रिक सल्लागारामार्फत चाचपणी करून मनोरी प्रकल्पाचा व्यवहार्य पर्याय निवडला आहे. ठाण्यासाठी स्वतंत्र निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्यापेक्षा मुंबईच्या प्रस्तावित प्रकल्पातच अतिरिक्त क्षमता निर्माण केल्यास दोन्ही पालिकांचा पायाभूत सुविधांवरील खर्च वाचणार आहे.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मुंबई पालिका आयुक्तांना पत्र पाठवून दोन्ही पालिकांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. यात पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या, पंपिंग व्यवस्था, विजेची गरज, संचालन-देखभाल खर्च आणि पाण्याचा दर या तांत्रिक व आर्थिक बाबींचा सविस्तर अभ्यास केला जाईल. हा प्रस्ताव मान्य झाल्यास भविष्यात ठाणे शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रस्तावाची पुढील तपासणी करण्यासाठी दोन्ही महापालिकांच्या संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. तांत्रिक व आर्थिक बाबींचा अभ्यास करून पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करता येईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ठाणे शहराच्या वाढत्या पाणी मागणीच्या पार्श्वभूमीवर ही व्यवस्था झाल्यास भविष्यातील पाणीपुरवठा नियोजनाला मोठी मदत होऊ शकते. तसेच उपलब्ध पायाभूत सुविधांचा अधिक कार्यक्षम वापर होऊन दोन्ही महापालिकांसाठी हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो, अशी भूमिका ठाणे महापालिकेने मांडली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475