पदकांची हॅट्ट्रिक!
ठाणे : ठाण्याचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा युवा नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील याने जपानमध्ये पार पडलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत आपल्या अचूक निशाण्याने भारतीय क्रीडाक्षेत्राची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. या स्पर्धेत रुद्रांक्षने दमदार कामगिरी करत तब्बल तीन पदकांची हॅट्ट्रिक साधली.
रुद्रांक्षने १० मीटर एअर रायफलच्या वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक, तर सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवले. याशिवाय ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्सच्या सांघिक प्रकारातही त्याने भारताला रौप्यपदक मिळवून दिले. एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन पदके पटकावून त्याने आपली यशोगाथा कायम ठेवली आहे.
गेल्या आठ वर्षांपासून भारतीय नेमबाजी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रुद्रांक्षने आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत २५ पदकांची कमाई केली आहे. यापूर्वीच्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्रांक्षच्या नावावर आता जपानमधील कामगिरीमुळे आशियाई पदकांची संख्या चारवर पोहोचली आहे. अवघ्या १८ व्या वर्षी रायफल शूटिंगमध्ये विश्वविजेता ठरलेला तो अभिनव बिंद्रानंतर भारताचा सर्वांत तरुण विश्वविजेता नेमबाज मानला जातो. सध्या तो १० मीटर एअर रायफल आणि ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स या दोन प्रमुख प्रकारांत देशाचे प्रतिनिधित्व करतो.
रुद्रांक्षच्या या यशाबद्दल त्याचे वडील ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि आई ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) हेमांगिनी पाटील यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला. "गेल्या आठ वर्षांपासूनचा त्याचा प्रवास, १८ व्या वर्षी झालेले विश्वविजेतेपद आणि २५ आंतरराष्ट्रीय पदके ही त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीचीच पावती आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. रुद्रांक्षच्या