जिल्हा

'मराठवाड्याने स्वातंत्र्यासाठी लढा दिला, आता समृद्धीसाठी लढायचे आहे'

'मराठवाड्याने स्वातंत्र्यासाठी लढा दिला, आता समृद्धीसाठी लढायचे आहे'
'मराठवाड्याने स्वातंत्र्यासाठी लढा दिला, आता समृद्धीसाठी लढायचे आहे' फोटो: ठाणे वैभव

मंत्री प्रताप सरनाईक यांचे उद्गार

ठाणे : "मराठवाड्याने स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आहे; आता पाणी, शेती, रोजगार आणि सर्वांगीण समृद्धीसाठी लढा द्यायचा आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ही या भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यातच आहे," असे उद्गार परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे येथे काढले.

मराठवाडा जनविकास परिषदेच्या वतीने आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्राम सोहळ्यात सत्कार स्वीकारताना ते बोलत होते. या कार्यक्रमात 'मराठवाडा मित्र' आणि 'मराठवाडा रत्न' पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात सरनाईक म्हणाले, "१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला असला तरी निजामशाहीच्या जोखडातून मराठवाड्याची मुक्तता १७ सप्टेंबर १९४८ रोजी झाली. या मुक्तिसंग्रामात असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे हा दिवस केवळ इतिहासाचे स्मरण करण्याचा नसून त्यांच्या बलिदानातून विकासाची प्रेरणा घेण्याचा आहे."

"मुक्तिसंग्राम संपला असला तरी आजचा संघर्ष संपलेला नाही," असे सांगत त्यांनी मराठवाड्यासमोरील गंभीर पाणीटंचाई आणि शेतीच्या संकटाकडे लक्ष वेधले. धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या खंडांमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, पिण्याचे पाणी, चारा व पिकांच्या नुकसानीबाबत प्रशासनाला प्रत्यक्ष पाहणी करून त्वरित मदत पुरवण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जलसंधारण, शेततळी, सिंचन, भूजल संवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर यांवर भर देत, "मुक्तिसंग्रामाचा इतिहास घडवणाऱ्या मराठवाड्याने आता जलसंधारण आणि शेतीच्या नव्या क्रांतीचा इतिहास घडवावा," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्याला मिळालेला सत्कार हा वैयक्तिक नसून मराठवाड्याची माती, स्वातंत्र्यसैनिक, शेतकरी आणि तरुण पिढीचा सन्मान असल्याचे सांगत "जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा!" या घोषणेने त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475