जिल्हा

सागरी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी 'सागरी भूमिपुत्र महासंघा'ची स्थापना

सागरी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी 'सागरी भूमिपुत्र महासंघा'ची स्थापना
सागरी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी 'सागरी भूमिपुत्र महासंघा'ची स्थापना फोटो: ठाणे वैभव

ठाण्यात उद्या शक्ती प्रदर्शन

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील पाच प्रमुख सागरी जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त, शेतकरी, मच्छिमार आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी 'सागरी भूमिपुत्र महासंघ' मैदानात उतरत आहे. ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांतील विविध समाज घटकांना एकत्र आणून, २९ सप्टेंबर रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सकाळी ९ वाजता या महासंघाचा स्थापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या पुढाकारातून ही एकजूट बांधण्यात येत असून या सोहळ्याच्या माध्यमातून मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. वाढत्या शहरीकरणामुळे स्थानिक गावठाणे, कोळीवाडे, शेती, मच्छिमारी आणि पारंपरिक व्यवसायांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. या पार्श्वभूमीवर आगरी, कोळी, कराडी, कुणबी, आदिवासी, भंडारी आणि बारा बलुतेदार समाजाला एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न या महासंघाच्या माध्यमातून केला जात आहे.

विकास प्रकल्पांमुळे विस्थापित होणाऱ्या भूमिपुत्रांचे प्रश्न मांडणे हा महासंघाचा मुख्य उद्देश आहे. सिडको, एमएमआरडीए, एमआयडीसी, जेएनपीए, बुलेट ट्रेन, वसई-विरार-अलिबाग कॉरिडोअर आणि वाढवण बंदर यांसारख्या मोठ्या विकास प्रकल्पांतील जमीन संपादन, योग्य मोबदला, पुनर्वसन आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर महासंघ आवाज उठवेल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी महासंघाकडून पाठपुरावा केला जाईल. मच्छिमारांचे हक्क, सागरी पर्यावरणाचे रक्षण, स्थानिक तरुणांना रोजगार व उद्योजकतेच्या संधी, शिक्षण-आरोग्य सुविधा आणि वीज ग्राहकांच्या समस्या निकाली काढणे या बाबींवर भर दिला जाईल.

लोकशाही आणि घटनात्मक मार्गाने भूमिपुत्रांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी ही संस्था काम करेल. या स्थापना सोहळ्यास बालयोगी सदानंद महाराज, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार आणि पद्मश्री लक्ष्मण माने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना 'विशेष सागरी रत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच पाचही जिल्ह्यांतील आजी-माजी आमदार, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक प्रतिनिधी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475