जिल्हा

ठाण्यातील काही भागात आज पाणी नाही

ठाण्यातील काही भागात आज पाणी नाही
ठाण्यातील काही भागात आज पाणी नाही फोटो: ठाणे वैभव

ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो.

यावर्षी पावसाळ्यानंतरचा कमी पाऊस व अल निनोचा प्रभाव आणि ऑक्टोबर २०२६ पासून मान्सूनने लवकर माघार घेतल्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे १० टक्के पाणी कपात करण्याचे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणी पुरवठा गुरुवार १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपासून शुक्रवार १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहील.

शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475