जिल्हा

लाच घेताना ठामपाचा शिपाई जाळ्यात

लाच घेताना ठामपाचा शिपाई जाळ्यात
लाच घेताना ठामपाचा शिपाई जाळ्यात फोटो: ठाणे वैभव

ठाणे : मालमत्ता कराच्या पावतीवरील बदललेल्या नावाचे प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना वागळे प्रभाग समितीच्या शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

देवेंद्र कोळी (४३) असे शिपायाचे नाव असून ठाणे महापालिकेच्या वागळे प्रभाग समितीमधील मालमत्ता कर विभागात तो कार्यरत आहे. ३६ वर्षांचे तक्रारदार यांनी वागळे भागात त्यांच्या भागीदारीतील कंपनीकरिता एक कार्यालय भाड्याने घेतले आहे. या कार्यालयच्या मालमत्ता कर पावतीवरील नावात बदल असलेले प्रमाणपत्र देण्यासाठी शिपाई श्री.कोळी यांनी प्रमाणपत्र फी दोन हजार रुपये, त्या व्यतिरिक्त तीन हजार रुपयांची मागणी केली होती. त्याबाबत ४ नोव्हेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार काल ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १ च्या दरम्यान तक्रारदार यांनी शिपाई श्री.कोळी यांच्याशी संपर्क साधून काही पैसे कमी करण्याची मागणी केली असता त्यांनी तीन हजार घेतो, तुम्ही अडीच हजार द्या, अशी मागणी केली. 

त्यानंतर १. ३० ते २च्या दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वागळे प्रभाग समिती येथे सापळा रचून शिपाई देवेंद्र कोळी याला दोन हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केली. वागळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475