जिल्हा

खारीगावनंतर घोडबंदर येथे ठामपाची सीबीएसई शाळा

खारीगावनंतर घोडबंदर येथे ठामपाची सीबीएसई शाळा
खारीगावनंतर घोडबंदर येथे ठामपाची सीबीएसई शाळा फोटो: ठाणे वैभव

ठाणे: सीबीएसई बोर्डाच्या शाळेला ठाणेकरांची पसंती वाढत असून खारीगाव येथील ठाणे महापालिकेच्या शाळेला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर घोडबंदरमधील कावेसर येथे सीबीएसई शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आगामी महासभेत मांडण्यात आला आहे.

कावेसर भागातील शाळा आरक्षणाच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या सात मजली इमारतीमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

कावेसर येथील शाळा आरक्षणाच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या सात मजली इमारतीमध्ये पूर्व प्राथमिक ते इयत्ता दहावीपर्यंतची शाळा सुरू करण्यात येणार आहे. ही शाळा चालविण्यासाठी इच्छुक संस्थांकडून स्वारस्यपत्र मागविण्याचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

कावेसर येथे शाळेसाठी राखीव असलेली एकूण ३,५८० चौरस मीटर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. या जागेवर तळ अधिक सात मजली इमारत असून ४,११३.८५ चौरस मीटर बांधकाम क्षेत्रफळाची इमारत आहे. या इमारतीचा ताबा शिक्षण विभागाकडे देण्यात आला आहे. सीबीएसई शाळेसाठी आवश्यक असलेल्या जागेच्या निकषांची पूर्तता या ठिकाणी होत असल्याचे दावा महापालिकेने प्रस्तावात केला आहे.

शाळेच्या बाजूलाच विद्यार्थ्यांसाठी मैदानाची सुविधाही उपलब्ध आहे. ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि क्रीडा सुविधाही प्रस्तावित शाळेत ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष आणि गणित प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच नृत्य, संगीत, कला आणि क्रीडा यांसाठी स्वतंत्र खोल्या व सभागृह उपलब्ध आहेत. प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या पाण्याची सुविधा असून, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत. विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य आणि शालेय पोषण आहारासह महापालिकेच्या इतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा विनामूल्य देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत शाळेसाठी टेबल, खुर्च्या, बेंच, प्रोजेक्टर, दूरचित्रवाणी संच आणि अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475