जिल्हा

मोरबे-कळंबोली प्रवास होणार १५ मिनिटांत

मोरबे-कळंबोली प्रवास होणार १५ मिनिटांत
मोरबे-कळंबोली प्रवास होणार १५ मिनिटांत फोटो: ठाणे वैभव

महामार्ग भूसंपादन सुरू

ठाणे: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मोरबे-कळंबोली दरम्यान १३ कि.मी. लांबीचा नवा महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. २०३०पर्यंत हा मार्ग पूर्ण होणे अपेक्षित असून या मार्गामुळे मोरबे-कळंबोली प्रवास अवघ्या १५ मिनिटांत होणार आहे.

मोरबे-कळंबोली मार्गासाठी अंदाजे १२५ हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. या कामाला वेग देत डिसेंबरअखेरीस ९० टक्के भूसंपादन पूर्ण करून जानेवारी २०२७ मध्ये बांधकाम निविदा काढण्यात येणार असल्याचेही 'एनएचएआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. निविदा प्रक्रिया पूर्ण करून २०२७मध्ये कामाला सुरुवात करण्यात येईल. तर हे काम अडीच ते तीन वर्षांत, २०३० पर्यंत पूर्ण करून मार्ग सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. हा रस्ता सेवेत दाखल झाल्यास मोरबे-कळंबोली जंक्शन प्रवास केवळ १५ मिनिटांत शक्य होणार आहे. आज या प्रवासासाठी एक ते सव्वा तास लागतो. या मार्गामुळे ‘जेएनपीए’ला जाता येणार आहे. पुढे विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका सेवेत दाखल झाल्यास जेएनपीएला जाण्यासाठी आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.

मुंबई-दिल्ली प्रवास वेगवान करण्यासाठी ‘एनएचएआय’कडून मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्ग बांधण्यात येत आहे. या महामार्गातील शेवटचा टप्पा महाराष्ट्रातील तलासरी-मोरबे असा आहे. १५६ किमीच्या या टप्प्यातील तलासरी-रायते या अंदाजे १४० किमीचे काम सुरू असून, आतापर्यंत ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित १६ किमीच्या मार्गाचे काम रखडले आहे.

मोरबेहून पुढे जेएनपीएला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गिकेअंतर्गत जोडणी दिली जाणार आहे. मात्र, हा प्रकल्प रखडल्याने रायते-मोरबे टप्प्याचेही काम रखडले आहे.

बहुद्देशीय मार्गिकेचे काम पूर्ण झाले तरच रायतेवरून मोरबे व पुढे ‘जेएनपीए’कडे जाता येईल. त्यामुळे बहुद्देशीय मार्गिकेच्या जोडणीची वाट न पाहता एनएचएआयने मोरबे-कळंबोली असा नवा रस्ता बांधून ‘जेएनपीए’ला जोडणी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १३ किमीच्या रस्त्याच्या संरेखनाला केंद्र सरकारने मान्यता दिली. त्यानंतर ‘एनएचएआय’ने भूसंपादनाच्या प्रक्रियेस सुरुवात केल्याची माहिती ‘एनएचएआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475