जिल्हा

कर्जाला कंटाळून आत्महत्या: शिंदे गटाकडून दहा लाखांची मदत

कर्जाला कंटाळून आत्महत्या: शिंदे गटाकडून दहा लाखांची मदत
कर्जाला कंटाळून आत्महत्या: शिंदे गटाकडून दहा लाखांची मदत फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या कोपरखैरणे येथील स्व.रवींद्र शिंदे यांच्या परिवाराला शिंदे सेनेच्या वतीने १० लाख रुपये मदत देण्यात आली आहे. या मदतीमुळे त्या पिडीत कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोपरखैरणे सेक्टर १९ येथे राहणारे ३९ वर्षीय रवींद्र शिंदे यांनी प्रथमेश चव्हाण नामक व्यक्तीकडून २५ हजार रुपये व्याजावर घेतले होते. मात्र ही रक्कम आणि त्या रक्कमेचे व्याज तसेच चक्रवाढ व्याजाची रक्कम रवींद्र यांना भरता येत नव्हती. त्यामुळे त्यांना पैसे घेतलेल्या व्यक्तीकडून खडे बोल सुनावले जात होते, सतत पैशांसाठी तगादा लावला जात होता. या त्रासाला वैतागून रवींद्र यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. मृत्युसमयी त्यांनी एक चिट्ठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे लिहून ठेवली होती. त्यात माझ्या कुटुंबाला सांभाळून घ्या, असा भावनिक संदेश लिहिण्यात आला होता. या आत्महत्येची बातमी वर्तमान पत्रातून कळताच शिवसेनेचे बेलापूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी परिवाराचा शोध घेतला आणि त्यंची पत्नी आणि मुलीला बुधवारी ९ जुलै रोजी दहा लाख रुपयांची मदत सुपूर्द केली. फक्त २५ हजार रुपयांच्या पायी एक परिवारातील सदस्याला आत्महत्या करावी लागते, ही बाब निंदनीय आहे. असे प्रकार व्हायला नकोत. अशा प्रकारास कारणीभूत असणाऱ्या घटकांना कडक शासन व्हायला हवे, यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत आणि शिवसेना शिंदे परिवाराच्या मागे खंबीरपणे उभी राहील अशी भावना यावेळी किशोर पाटकर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत महिला शिवसेना जिल्हाप्रमुख शीतल कचरे, ऋषी पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475