जिल्हा

भाईंदर: पोलीस आयुक्तपदी निकेत कौशिक

भाईंदर: पोलीस आयुक्तपदी निकेत कौशिक
भाईंदर: पोलीस आयुक्तपदी निकेत कौशिक फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: मराठी प्रेमींच्या मीरा-भाईंदरमधील मोर्चाला परवानगी नाकारल्याने नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी निकेत कौशिक यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निकेत कौशिक हे महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालकपदी कार्यरत होते. पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांना अपर पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली असून त्यांच्याकडे पोलीस प्रशासन महाराष्ट्र राज्य विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. १४ डिसेंबर २०२२ रोजी पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार मधुकर पांडे यांनी स्विकारला होता. करोडो रुपयांच्या अमंली पदार्थासह शेकडो वाहनांच्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करुन गुन्हेगारांना कोठडीची हवा त्यांनी खायला लावली होती. एवढेच नव्हे तर शेकडो जणांचे चोरी झालेल्या सोन्याचे दागिने व मोबाईल मालकांना परत मिळवून दिले होते. मात्र ८ जुलै रोजी मराठी प्रेमींच्या मोर्चाला परवानगी नाकारुन भल्या पहाटे मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने मराठीप्रेमी महिला, युवक व ज्येष्ठ कार्यकर्ते हिरीरीने मोर्चात सहभागी झाल्याने मोर्चाबाबतचा पोलिसांचा अंदाज चुकला. एवढेच नव्हे तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दिशेने पाण्याची बाटली फेकण्याचा प्रकार घडल्याने मंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मंत्री सरनाईक यांनी घटनास्थळी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475