GENERAL

शहापूर-मुरबाड महामार्गावर अवतरले दगडांचे डोंगर

शहापूर-मुरबाड महामार्गावर अवतरले दगडांचे डोंगर
शहापूर-मुरबाड महामार्गावर अवतरले दगडांचे डोंगर फोटो: ठाणे वैभव
ठेकेदाराने रस्त्याच्या भरावासाठी वापरले दगड

शहापूर : एमएसआरडीसी अंतर्गत सन २०१८ पासून सुरू असलेला शहापूर-मुरबाड-पाटगाव-खोपोली ५४८ ए महामार्ग तब्बल आठ वर्षांपासून रखडलेला असतांना आता पुन्हा सुरू झालेल्या कामाच्या दर्जावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नुकत्याच झालेल्या आंदोलनानंतर कामाला सुरुवात झाली असली तरी रस्त्याच्या भरावासाठी मोठमोठे दगड, गोटे आणि मातीचा वापर केला जात असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाची तपासणी कोण करणार? असा सवाल नागरिक व वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहापूर-मुरबाड मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गणपतीपूर्वी रस्त्याचे काम मार्गी लागावे, यासाठी नारी शक्ती संघटनेने मंगळागौरीच्या दिवशी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आंदोलनादरम्यान रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाकडून काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेने आंदोलन स्थगित केले. त्यानंतर महामार्गाच्या कामाला काही प्रमाणात सुरुवात झाली. मात्र, काम सुरू होताच रस्त्याच्या कडेला व भरावाच्या ठिकाणी मोठमोठे दगड आणि गोट्यांचे ढीग टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. काही दगड आकाराने मोठे असून ते थेट भरावात वापरण्यात येत असल्याचे या छायाचित्रातून स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे रस्त्याच्या भरावासाठी कोणत्या दर्जाचे साहित्य वापरायचे, त्याचे तांत्रिक निकष काय आहेत आणि प्रत्यक्षात त्याचे पालन केले जात आहे का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

या महामार्गाचे काम एमएसआरडीसीच्या देखरेखीखाली सुरू असताना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता, भरावाची पद्धत, थरांची जाडी, दाबणी तसेच तांत्रिक मानकांनुसार काम होत आहे की नाही, याची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीने मोठमोठे दगड टाकले जात असतील तर संबंधित यंत्रणेचे अभियंते व अधिकारी नेमके काय पाहत आहेत? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. 

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475