ठाणे: देवदयानगर परिसरातील लक्ष्मीनारायण रेसिडेन्सी गृहसंकुलातील गणेशोत्सव यंदाही धार्मिक वातावरणात उत्साहात साजरा झाला.
गृहसंकुलाच्या क्लबहाऊसमध्ये गणेश चतुर्थीला वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले. गेल्या 19 वर्षांपासून दरवर्षी उत्साहात लक्ष्मी नारायण फेडरेशनच्या सहकार्यातून गणेशोत्सव साजरा केला जातो. अध्यक्ष संतोष दातखिळे, सचिव मोहन लिमये, खजिनदार अमित भन्साली यांच्या मार्गदर्शनाखाली अमित भन्साली, सुधाकर पुजारी, चारुहास खामकर, पुरुषोत्तम मुखेडकर, संतोष भोसले, प्रताप आरेकर आणि अनिल म्हात्रे यांनी उत्सव यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
गणेशोत्सवाच्या कालावधीत रेणू राणे, हेमा थापलियान, स्मिता ठाकरे, वैदेही शिंदे, आस्था गुप्ता, लिता वाघेला, गौरी कांदळगावकर आणि मिनी भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ, तरुण तसेच लहान मुलांसाठी संगीत, व्यक्तिगत अभिनय, नकला, गाणी, बुद्धिबळ, कॅरम आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.