शहापूर: गणरायाच्या भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड देत नडगाव येथे साकारलेल्या आकर्षक व पर्यावरणपूरक गणपती मखर सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आई गावदेवी विरा स्पोर्ट्स आयोजित या स्पर्धेत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करीत आकर्षक व कलात्मक मखर साकारून सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेचे दर्शन घडविले.
या स्पर्धेत जितेंद्र भालके यांनी प्रथम, शिवम सातपुते द्वितीय तर जगदीश जागरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे ५५५५, ४४४४ व ३३३३ रुपये आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमासाठी बक्षिसांचे सौजन्य नडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच कमल रेरा यांनी केले. दरम्यान परीक्षक म्हणून कलाशिक्षक मनिष व्यापारी व चित्रकार सुनिल फर्डे यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण कार्यक्रमास कमल रेरा, नरेश रेरा, राजेश भालके, दत्तात्रय भालके, राजेश जागरे, अरविंद मांजे, राजाराम मांजे, नारायण भोईर, उदय भोईर, सुनील फर्डे यांच्या हस्ते झाले.