जिल्हा
विमानतळ नामकरणासाठी भूमिपुत्रांचे जंतरमंतरवर आंदोलन
विमानतळ नामकरणासाठी भूमिपुत्रांचे जंतरमंतरवर आंदोलन
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे बुधवारी सागरी पट्ट्यातील भूमिपुत्रांनी थेट दिल्लीत धडक दिली असून जंतरमंतरवर वारी काढून आंदोलन केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील यांचे नाव द्यावे म्हणून सागरी पट्यातील भूमिपुत्रांनी अनेक आंदोलने केली आहेत. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर करून तो केंद्राकडे पाठवला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले आहे.. मात्र केंद्रात यावर कुठल्याच हालचाली होताना दिसत नसल्याने सागरी पट्ट्यातील भूमिपुत्रांनी बुधवार ५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर वारी काढून आंदोलन केले. या आंदोलनास खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांनी देखिल उपस्थिती दर्शवत पाठिंबा दिला.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475