जिल्हा
अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनानंतर ठाणे शहर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत काल रात्री नगर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांवर तातडीने कारवाईची मागणी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर ठाणे काँग्रेस कार्यकर्ते संतापले असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे काँग्रेस अध्यक्षा राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी नगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना निवेदन सादर केले होते.
आंदोलन प्रकरणी राहुल पिंगळे यांच्यासह ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठाणे नगर पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चौधरी यांची भेट घेत घटनेचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यावेळी ॲड. प्रभाकर थोरात, ॲड. दरम्यान सिंह, ॲड. हिदायत मुकदम, ॲड.वसंत जगदाळे, ॲड.मनोज डाकवे, महेंद्र म्हात्रे, नाना कदम, रवी कोळी, स्मिता वैती, धर्मवीर मेहरोल यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसने या प्रकरणात कोणालाही पाठीशी न घालता त्वरित आणि निष्पक्ष कारवाई करावी, असे मागणी पुन्हा एकदा केली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475