जिल्हा

सहा हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे पक्के घर

सहा हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे पक्के घर
सहा हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे पक्के घर फोटो: ठाणे वैभव

सिद्धेश्वर क्लस्टरचे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन 

ठाणे : वर्षानुवर्षे झोपडपट्टी आणि जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या सिद्धेश्वर तलाव परिसरातील सुमारे सहा हजार रहिवाशांना आता हक्काचे पक्के घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

झोपडपट्टीसह जुन्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करणाऱ्या सिद्धेश्वर नगर क्लस्टर प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या २३ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या जुन्या वस्तीच्या पुनर्विकासाच्या तिढा अखेर मार्गी लागणार आहे. ठाणे महापालिका झाल्यापासून काही अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर तलाव परिसरात मोठी झोपडपट्टी आहे. त्यामध्ये दोन हजारांहून अधिक कुटुंबे अनेक वर्षांपासून राहत आहेत. याशिवाय परिसरातील सुमारे ३० ते ४० जुन्या इमारतींमध्येही मोठ्या संख्येने रहिवासी आहेत. अरुंद घरे, जुन्या इमारती आणि अपुऱ्या नागरी सुविधांमध्ये राहणाऱ्या या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.

सिद्धेश्वर परिसराचा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून विकास करण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र, विविध तांत्रिक अडचणींमुळे पुनर्विकासाची प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे येथील रहिवासी सुद्धा हवालदिल झाले होते.  झोपडपट्टी आणि जुन्या इमारतींचा स्वतंत्र विकास करण्याऐवजी संपूर्ण परिसराचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजनेचा पर्याय पुढे आला. त्यानुसार सिद्धेश्वर नगर क्लस्टर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी सुगी बांधकाम कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या 23 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

ठाण्यातील जुन्या आणि धोकादायक इमारती, चाळी तसेच झोपडपट्ट्यांचा समूह पद्धतीने पुनर्विकास करण्यासाठी २०१२ पासून क्लस्टर योजनेचा पाठपुरावा करण्यात आला. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर ठाण्यात क्लस्टरची अंमलबजावणी सुरू झाली. ठाण्यातील क्लस्टर योजनेचा पहिला मोठा टप्पा किसननगर येथे सुरू झाला. जून २०२३ मध्ये किसननगर क्लस्टरचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पात सुमारे १० हजार घरांचा समावेश असल्याचे त्यावेळी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर तेथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. आता किसननगरनंतर सिद्धेश्वर तलाव परिसरातील क्लस्टर प्रकल्पाचा टप्पा सुरू होत आहे. सुमारे सहा हजार घरे क्लस्टरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे या परिसरातील हजारो कुटुंबांना नवीन घराची प्रतीक्षा संपण्याची आशा निर्माण झाली आहे.

क्लस्टर पुनर्विकासामुळे केवळ रहिवाशांचे पुनर्वसन होणार नसून सिद्धेश्वर तलाव परिसरातील पायाभूत आणि नागरी सुविधांमध्येही बदल होण्याची अपेक्षा आहे. रस्ते, इतर नागरी सुविधा आणि नियोजनबद्ध बांधकामामुळे सध्याच्या दाट वस्तीचे स्वरूप बदलणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475