जिल्हा

ट्रायल रनला एक वर्ष पूर्ण; मेट्रो प्रवासाचे स्वप्न अपूर्ण

ट्रायल रनला एक वर्ष पूर्ण; मेट्रो प्रवासाचे स्वप्न अपूर्ण
ट्रायल रनला एक वर्ष पूर्ण; मेट्रो प्रवासाचे स्वप्न अपूर्ण फोटो: ठाणे वैभव

शरद पवार गटाचे अनोखे आंदोलन

ठाणे : ठाणे शहराची भविष्यातील जीवनवाहिनी असलेल्या मेट्रो मार्गिकेची मोठा गाजावाजा करून ट्रायल रन घेण्यात आली, मात्र एक वर्ष उलटूनही ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, असा आरोप करत ठाण्यात शरद पवार गटाने अनोखे आंदोलन केले.

वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली-गायमुख या ‘मेट्रो मार्गिका-4 आणि 4-अ' प्रकल्पाची एकूण लांबी 35.20 किमी आहे. या संपूर्ण उन्नत मार्गावर एकूण 32 स्थानके असतील. प्रकल्पाचा एकूण खर्च 15,498 कोटी आहे. मागील वर्षी या मेट्रो मार्गाची ट्रायल रन घेण्यात आली होती. मात्र, वर्षभरानंतरही अपेक्षीत प्रगती झालेली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी बाप्पा राज्यकर्त्यांना सुबुद्वी दे... ठाणेकरांना मेट्रोत बसू दे, या सरकारचे करायचे काय; खाली डोके वरती पाय, घोडबंदरकरांना ट्रॅफिकमुक्त प्रवास द्या, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. 

आज दुपारी चार वाजेच्या सुमारास चितळसर- मानपाडा पोलीस ठाण्यासमोरील मेट्रो मार्गाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसेच गटनेते अभिजीत पवार यांच्या उपस्थितीत एकवटले. या कार्यकर्त्यांनी प्रस्तावित स्टेशनमध्ये जाऊन रेल्वे मार्गास तसेच स्टेशनच्या फलकास हार घातले; रेल्वे रूळांना नारळ फोडून राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो, अशी प्रार्थना केली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475