जिल्हा

ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना पद्मश्री डॉ. रोशनकुमारी यांचे निधन

ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना पद्मश्री डॉ. रोशनकुमारी यांचे निधन
ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना पद्मश्री डॉ. रोशनकुमारी यांचे निधन फोटो: ठाणे वैभव

ठाणे: जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना पद्मश्री डॉ. रोशनकुमारी फकीर मोहम्मद यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या.

डॉ. रोशनकुमारी यांचा जन्म, तबलनवाझ चौधरी फकीर मोहम्मद आणि शास्त्रीय गायिका जोहराबाई अंबालेवाली या दाम्पत्याच्या पोटी झाला. हिरानंदानी, ठाणे येथे त्या राहत होत्या. वृद्धपकाळाने आजारी असल्याने त्या वांद्रे मुंबई येथे सध्या राहत होत्या.

कथ्थक नृत्याचे सुरुवातीचे प्रशिक्षण के.एस. मोरय यांच्याकडे घेतले. त्यानंतर त्यांनी महाराज बिदादिन स्कूल ऑफ कथ्थक या संस्थेत सुंदर प्रसाद  आणि नंतर गुलाम हुसेन खान, हनुमंत प्रसाद यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले. याशिवाय गोविंदराज पिल्लई आणि महालिंगम पिल्लई यांच्याकडून रोशनकुमारी यांनी भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले. बिमल रॉय यांच्या परिणीता चित्रपटातून १९५३ साली नृत्यांगना म्हणून रोशनकुमारी यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर नितीन मोदी यांच्या वारीस, सोहराब मोदी यांच्या मिर्झा गालिब चित्रपटात छाप पाडली. भारत सरकारने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून कथ्थक नृत्याचा इतिहास आणि प्रशिक्षण यांचा आढावा घेणारा वार्तापट तयार केला होता. त्यात दमयंती जोशी, उमा शर्मा, सुदर्शन धीर, शंभु महाराज यांच्या जोडीने डॉ. रोशनकुमारी यांनाही मानाचे स्थान देण्यात आले होते. नंतरच्या काळात नृत्य दिग्दर्शनाकडे वळलेल्या डॉ रोशनकुमारी यांनी १९७५ साली चैताली, १९९० साली गोपी आणि लेकीन,१९९६ साली सरदारी बेगम चित्रपटाचे  नृत्यदिग्दर्शन केले होते. डॉ रोशनकुमारी यांना १९७५ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर १९८४ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने भारत सरकारने सन्मानित केले होते. कथ्थक नृत्याला वाहून घेतलेल्या डॉ रोशनकुमारी यांनी नृत्य कला केंद्राची स्थापना करुन अनेक कथ्थक नर्तक तयार केले होते. त्यात मुक्ता जोशी, नंदिता पुरी, शर्मिला दास आणि जेष्ठ सिने कलावंत सायरा बानो अशा अनेक नर्तकांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475