जिल्हा

कामे उरकण्यासाठी सत्ताधाऱ्यांची घाई; विरोधक करू लागले पंचनामे

कामे उरकण्यासाठी सत्ताधाऱ्यांची घाई; विरोधक करू लागले पंचनामे
कामे उरकण्यासाठी सत्ताधाऱ्यांची घाई; विरोधक करू लागले पंचनामे फोटो: ठाणे वैभव
पालिका निवडणुकीची लगीनघाई ठाणे: आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून पालिका निवडणुकीच्या आधी प्रकल्प, नागरी कामे तसेच महत्वाचे प्रस्ताव प्रशासकीय स्तरावर मंजूर करून ते कसे मार्गी लावता येतील असा प्रयत्न शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सुरु झाला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून ठाण्यातील प्रकल्प आणि नागरी कामांचा पंचनामा सुरु करण्यात आला आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका निवडणुका या युतीमध्येच लढवण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत, मात्र असे असले तरी, उबाठा, शिवसेना, भाजप,आणि सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे कामाला सुरुवात केली आहे. विकास कामांचा आढावा घेण्यासोबतच नागरी कामे कशी वेळेत पूर्ण होतील यासाठी पालिका आयुक्तांसोबत बैठका घेण्याचा सपाटा शिवसेनेकडून सुरु करण्यात आला आहे. ठाण्यात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या योजनांच्या अनुषंगाने प्रशासनासोबत बैठका घेऊन प्रशासनाला विविध आदेश दिले. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आयुक्तांसोबत बैठक घेऊन विकास कामांना गती देण्याच्या सुचना दिल्या. एकीकडे नागरी कामांचा आढावा घेण्याचे घेण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरु करण्यात आले असून दुसरीकडे आतापर्यंत आक्रमक नसलेले ठाण्यातील विरोधक देखील आता नागरी प्रश्नांवरून आक्रमक झाले आहेत. उबाठा पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्याचे आयुक्त सौरभ राव यांची तर कल्याण-डोंबिवलीमध्ये उबाठा पक्षाचे पदाधिकारी विजय साळवी यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांनाही नागरी समस्यांचे निवेदने दिले. एकुणच शिवसेना, भाजप आणि उबाठा पक्षाकडून या भागातील नागरी प्रश्नांवरून प्रशासनाला जाब विचारण्यास सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणूकांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यामध्ये लाडकी बहिण योजनेचे महत्व लक्षात घेऊन महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक इच्छुक राजकीय पदाधिकाऱ्यांनी विविध सहलींचे आयोजन केले आहे. यामध्ये महिलांसाठी सहली, देवदर्शन आणि यात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील प्रभागांमधून अशा सहलीच्या गाड्या शिर्डी, अक्कलकोट, पंढरपुर सारख्या देवस्थानांकडे सोडल्या जात आहेत. याशिवाय आधारकार्ड शिबीर, मतदान कार्ड शिबीर, शासकीय योजनांचे अर्ज भरण्याचे शिबीरे, आरोग्य तपासणी शिबीरांच्या माध्यमातूनही मतदार जोडणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, या सर्व महापालिकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. काही महापालिकांच्या कार्यकाळ संपून दोन ते तीन वर्ष झाले आहेत. यामुळे या महापालिकांच्या पूर्ण कारभार हा प्रशासनाच्या हातात आला आहे. अद्याप निवडणुकांची तारीख जाहीर झालेली नसली तरी निवडणूक कधीही लागण्याची शक्यता असल्याने नागरी समस्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे मनसुबे विरोधांकडून करण्यात आले आहे. तर नागरी कामांच्या जोरावर निवडणूका जिंकण्याचे मनसुबे सत्ताधाऱ्यांकडून आखण्यात आले असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475