जिल्हा

ठामपाचे सोनग्रा, बोडके यांची बदली

ठामपाचे सोनग्रा, बोडके यांची बदली
ठामपाचे सोनग्रा, बोडके यांची बदली फोटो: ठाणे वैभव

ठाणे : ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा आणि घनकचरा विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांची बदली त्यांच्या मूळ विभागात करण्यात आली असून नगर अभियंत्यांच्या जागी सुरेंद्रकुमार काटकर यांची नियुक्ती झाली आहे.

महापालिकेच्या नगर अभियंतापदी मागिल साडेतीन वर्षे श्री. सोनग्रा कार्यरत होते. त्यांची राज्य सरकारने एमएसआरडीसी या विभागात बदली केली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेंद्रकुमार काटकर यांची बदली करण्यात आली असून त्यांनी महापालिकेच्या नगर अभियंता पदाचा पदभार स्वीकारला आहे तर घनकचरा आणि वृक्ष प्राधिकरण विभागात अतिशय उत्तम काम करणारे उपायुक्त मधुकर बोडके यांची त्यांच्या शिधावाटप आणि नियंत्रण विभाग मुंबई या मूळ खात्यात बदली केली आहे. मागिल दोन वर्षे ते ठामपात कार्यरत होते.  ठाणे शहरातील काही भागात शून्य कचरा मोहीम त्यांनी राबवली होती. त्यांच्या जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475