जिल्हा

वाशीत बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड

वाशीत बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड
वाशीत बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड फोटो: ठाणे वैभव

नवी मुंबई : वाशीतील मॅफ्को रोडवरील हॉटेलच्या टेरेसवर पहाटेपर्यंत सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर एपीएमसी पोलिसांनी बुधवार ७ ऑक्टोबर रोजी पहाटे छापा टाकला. कारवाईच्या वेळी तेथे सात ते आठ तरुण-तरुणी हुक्का ओढत असल्याचे आढळून आले. हुक्क्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि विविध फ्लेवरचे डबे जप्त करण्यात आले असून, पार्लर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशी सेक्टर १९ए येथील मॅफ्को रोडवरील ‘ब्लिस कॅफे, सिझार इन हॉटेल’च्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर हा प्रकार सुरू होता. या ठिकाणी हुक्क्यामध्ये निकोटिन व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर केला जात असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील यांच्या पथकाने बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास कारवाई केली.

पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये पोहोचले असता टेरेसवरील हुक्का पार्लरमध्ये सात ते आठ तरुण-तरुणी हुक्का ओढत असल्याचे दिसून आले. परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचा धूर पसरलेला होता. ग्राहकांना निकोटिनच्या सेवनाबाबत कोणतीही जनजागृतीपर सूचना किंवा इशारा देणारे फलकही तेथे लावण्यात आले नव्हते. हुक्का पार्लर सुरू करण्यासंदर्भातील नियमांचे पालन होत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी चार पारदर्शक काचेचे हुक्का पॉट, प्लास्टिकच्या नळ्या तसेच विविध फ्लेवरचे डबे असा सुमारे सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मो. उस्मान सगीर खान याच्याविरोधात सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण विनियमन) अधिनियम, २००३ (सुधारित २०१८) मधील कलम ४(क) आणि २१(क) तसेच मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३३(डब्ल्यू) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475