जिल्हा

बीएमटीसीच्या माजी कामगारांना बाप्पा पावला

बीएमटीसीच्या माजी कामगारांना बाप्पा पावला
बीएमटीसीच्या माजी कामगारांना बाप्पा पावला फोटो: ठाणे वैभव
९० जणांना १० लाखांचे धनादेश वाटप

नवी मुंबई: ४३ वर्षांपुर्वी सिडकोच्या बंद पडलेल्या बीएमटीसी परिवहन सेवेत कार्यरत असलेल्या माजी कामगारांना शासनाने १० लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्या कामगारांना सिडकोतर्फे १० लाख रुपये आर्थिक मदतीचे धनादेश दिले जात असून गणेशोत्सवात ९० जणांना हे धनादेश देण्यात आल्याने या कामगारांना गणपती  बाप्पा पावल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.

नवी मुंबईतील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोने बीएमटीसी परिवहन सेवा सुरू केली. मात्र, काही वर्षांतच या परिवहन सेवेचे आर्थिक गणित बिघडले. वाढता खर्च आणि आर्थिक अडचणी यामुळे अखेर सिडकोला ही सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. परिवहन सेवा बंद झाल्यानंतर तेथे कार्यरत असलेल्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. सेवा बंद झाल्यामुळे अनेक कामगारांवर आर्थिक संकट ओढावले. त्यामुळे सिडकोने कामगारांना योग्य आर्थिक मोबदला द्यावा, या मागणीसाठी माजी कामगारांनी सातत्याने पाठपुरावा केला. मागील ४३ वर्षांत विविध पातळ्यांवर आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा करण्यात आला. मात्र, निर्णय होत नसल्याने कामगारांची प्रतीक्षा कायम होती.

माजी बीएमटीसी कामगारांच्या मागणीची दखल घेत  सिडकोने आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पात्र कामगारांना १० लाख रुपये अथवा एक व्यावसायिक गाळा देण्याचा ठराव करण्यात आला. हा ठराव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. शासनाकडून या ठरावाला राज्याचे उप मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने  मंजुरी मिळाल्याने आर्थिक मोबदला देण्यातील प्रमुख अडथळा दूर झाला.

शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर सिडकोकडून पात्र माजी कामगारांना १० लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आर्थिक मदतीसाठी एकूण १५८७ कामगार पात्र ठरले आहेत. त्यापैकी ४१० कामगारांना मदत दिल्यानंतर ऐन गणपतीत शुक्रवार  दिनांक १८ सप्टेंबर रोजी आणखी ९० जणांना १० लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. त्यामुळे एकूण १५८७ कामगारांपैकी एकूण ५०० जणांना आतापर्यंत आर्थिक मदतीचा लाभ मिळाला असून त्या कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.मात्र  उर्वरित कामगारांना देखील सिडको  लवकरात लवकर आर्थिक मदत  द्यावी, अशी मागणी बीएमटीसीचे माजी कामगार जगन्नाथ पाटील यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475