जिल्हा

कर्णकर्कश

कर्णकर्कश
कर्णकर्कश फोटो: ठाणे वैभव

* डीजेची कसर ढोल-ताशांनी भरून काढली

* आवाजाचा पारा १०५ डेसिबलवर!

ठाणे: 'डीजे’वरील निर्बंधांमुळे विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण येण्याची शक्यता व्यक्त होत असताना शनिवारी मात्र डीजेची कसर ढोल-ताशे, बॅन्जो, ध्वनिक्षेपक आणि मोठ्या धातूच्या वाद्यांनी भरून काढल्याचे दिसून आले. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या तपासणीत ध्वनीपातळी १०५ डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे आढळून आले.

श्री राम मारुती रोडवर रात्री साडेनऊ वाजता ८५ ते ९० डेसिबल ध्वनीपातळी नोंदविण्यात आली. एकापाठोपाठ एक मिरवणुका या मार्गावरून जात होत्या. बहुतांश मिरवणुकांमध्ये ढोल-ताशे आणि बॅन्जोचा दणदणाट सुरू होता, तर सुमारे निम्म्या मिरवणुकांमध्ये ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यात आला. एकत्रित मिरवणुकांमुळे या भागातील आवाजाची सरासरी पातळी ८५ ते ९५ डेसिबल इतकी होती. रात्री दहाच्या सुमारास पाचपाखाडी रोडवर ध्वनीपातळी ९० ते ९५ डेसिबल नोंदली गेली. ढोल-ताशांसोबत ‘डीजे’ आणि ध्वनिक्षेपकांचा वापर सुरू होता. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता ठाणे महापालिका कचराळी तलाव परिसरातही ९० ते ९५ डेसिबल आवाजाची नोंद झाली. येथे ढोल-ताशे आणि बॅन्जोचा कर्णकर्कश आवाज ऐकू येत होता.

रात्री अकरा वाजता मात्र ध्वनीप्रदूषणाने आणखी गंभीर पातळी गाठली. आयसीआयसीआय बँकेजवळ १०० ते १०५ डेसिबल ध्वनीपातळी नोंदली गेली. अनेक ढोल-ताशे, ध्वनिक्षेपकांसोबत मोठ्या आकाराच्या धातूच्या नळीसदृश वाद्याचा वापर करण्यात आला. या वाद्याच्या तीव्र आवाजामुळे परिसर अक्षरशः हादरून गेला.

तलावपाळी परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारासही आवाजाचा दणदणाट थांबलेला नव्हता. येथे पुन्हा १०० ते १०५ डेसिबल ध्वनीपातळी नोंदली गेली. मोठे धातूचे वाद्य, ढोल-ताशे आणि अनेक ध्वनिक्षेपकांच्या एकत्रित आवाजाने रात्रीची शांतता भंग केली.

चौकट

ध्वनीप्रदूषणाच्या या परिस्थितीवर भाष्य करताना डॉ. महेश बेडेकर यांनी उपरोधिक शब्दांत प्रतिक्रिया दिली. “कानठळ्या बसणे, कानाचा पडदा फाटणे या मराठी संज्ञांचा अनुभव घ्यायचा असेल, तर विसर्जन मिरवणुकीत जरूर सहभागी व्हावे,” अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475