जिल्हा

दिव्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकजण जखमी

दिव्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकजण जखमी
दिव्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकजण जखमी फोटो: ठाणे वैभव

ठाणे : दिवा येथील दातिवली परिसरात सोमवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत विशाल घाडी (२८) हे तरुण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

दातिवली परिसरातील साईनाथ अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या एका घरात सोमवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटाचा आवाज झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच टोरंट पॉवरचे कर्मचारी आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

स्फोटानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने प्रयत्न सुरू केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत विशाल घाडी हे जखमी झाले. त्यांना तातडीने परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475