जिल्हा

दिव्यात २३ वाहने जळून खाक

दिव्यात २३ वाहने जळून खाक
दिव्यात २३ वाहने जळून खाक फोटो: ठाणे वैभव

ठाणे: दिव्यातील साबेगाव परिसरात मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास रस्त्यालगत उभ्या असलेल्या २३ वाहनांना आग लागल्याची घटना घडली. या आगीत एक रिक्षा आणि २२ दुचाकी जळून खाक झाल्या. आग नेमकी कशामुळे लागली की ती लावण्यात आली, याचा तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

दिव्यातील अनेक इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्था नसल्याने रहिवाशांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागतात. साबेगाव येथील आदर्श विद्यालयासमोरील रस्त्यावरही रहिवाशांनी वाहने उभी केली होती. यामध्ये एका रिक्षेसह २२ दुचाकींचा समावेश होता. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास या वाहनांना अचानक आग लागली.

घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून पहाटे ३.१६ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत आगीत जवळपास सर्व वाहने पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेमुळे वाहनमालकांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475