जिल्हा

डोंबिवली एमआयडीसीत १० टक्के पाणीकपात

डोंबिवली एमआयडीसीत १० टक्के पाणीकपात
डोंबिवली एमआयडीसीत १० टक्के पाणीकपात फोटो: ठाणे वैभव

डोंबिवली: एल निनोचा वाढता प्रभाव व पुढील वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शासन निर्देशाप्रमाणे १० टक्के पाणी कपातीला सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरूवार, १५ ऑक्टोबर रोजी रात्री १२ ते शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांकरिता पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाने घेतला आहे. ३१ ऑगस्ट २०२७पर्यंत ही पाणी कपात लागू राहील.

गुरुवार २२ ऑक्टोबर व पुढील प्रत्येक गुरुवारी रात्री १२ पासून ते शनिवारी दुपारी १२ पर्यंत ३६ तास पाणी कपात करण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. एमआयडीसीचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी ही माहिती दिली. आधीच गेल्या वर्षापासून एमआयडीसीच्या अनेक भागांत नियमित पाणी टंचाईची निर्माण झाली असताना, आता पाणी कपात सुरू झाल्याने रहिवाशांमध्ये या पाणीटंचाईच्या माहितीने अस्वस्थता पसरली आहे. मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी यापूर्वी एमआयडीसीतील रहिवासी, उद्योजकांनी वेळोवेळी एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केले आहेत. शासनाकडे पत्रव्यवहार केले आहेत.

या पाणीकपातीच्या कालावधीत डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर पालिका व डोंबिवली, कल्याण ग्रामीणमधील गावे यांचा पाणीपुरवठा बंद राहील. बंदनंतर पाणीपुरवठा सुरू झाल्यावर दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक, व्यावसायिक, उद्योजकांनी पुरेसा पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन एमआयडीसीतर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475