जिल्हा
ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसेनेत
ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसेनेत
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक योगेश जानकर यांच्या पुढाकाराने वागळे विभागातील किसननगर-भटवाडी परिसरातील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
ठाकरे गटाच्या विभागप्रमुख शुभांगी तावडे, शाखाप्रमुख रूपाली बोराडे, जयश्री देशमुख, उपशाखाप्रमुख सुवर्णा डावल, सुप्रिया निर्मल, गणेश डावल, अशोक कल्लोरी, संदीप नाईक, प्रथमेश मुंडलिक यांच्यासह शेकडो महिला भगिनी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी खासदार संदीपान भुमरे, खा.नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक साहेब, माजी नगरसेवक मनोज शिंदे, समाजसेविका डॉ.दर्शना जानकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
300x450
300x600