जिल्हा

बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग

बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग
बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग फोटो: ठाणे वैभव

डोंबिवली : राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होऊन बळीराजाला दिलासा मिळावा, शेतीला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे आणि महाराष्ट्र सुजलाम्-सुफलाम् व्हावा यासाठी डोंबिवली पूर्वेतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. 

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित या उत्सवाच्या सुरुवातीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग आणि घटस्थापना करण्यात आली. वेदमूर्ती रवींद्र पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक मंत्रोच्चार, सप्तशती पाठवाचन, पूजाविधी आणि होमहवन पार पडले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सपत्नीक देवीची विधिवत पूजा करून घटस्थापना केली. राज्यातील शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, पर्जन्यमान चांगले व्हावे आणि नागरिकांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली.

शेतकरी बांधवांच्या अडचणी आणि दुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन यंदा सामाजिक बांधिलकी जपत रासरंग दांडिया महोत्सव रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. त्याऐवजी धार्मिक विधी, महायाग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देण्यात आला आहे. बळीराजाच्या कल्याणासाठी आयोजित सहस्रचंडी महायाग हा यंदाच्या नवरात्रोत्सवाचा प्रमुख आकर्षण ठरला आहे.

११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या उत्सवात देवीची महापूजा, सप्तशती पाठवाचन, होमहवन, आरती आणि महाप्रसाद यांसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. हरिपाठ, कीर्तन, भजन, महिला भजनी मंडळांचे सादरीकरण, लोककला आणि भक्तिसंगीताच्या कार्यक्रमांचाही यात समावेश आहे.

दरम्यान नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रविवारी ११ ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि भक्तिसंगीतातील त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीचा आनंद रसिकांना घेता आला. उत्सवासाठी उभारण्यात आलेला भव्य सभामंडपही आकर्षण आहे. देवीच्या तीर्थक्षेत्राची अनुभूती देणारी सजावट, मनोहारी प्रतिमा आणि कलात्मक शिल्पांमुळे परिसराला भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475